पायरी 1: खाली दिलेल्या देशांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सेवा जाहिराती दाखवण्यासाठी जाहिरातदारांनी – पहिली पायरी म्हणून – G2 द्वारा पडताळणी करून घेतलीच पाहिजे. G2 वित्तीय सेवा पडताळणी पत्र मिळवण्यासाठी जाहिरातदारांनी दाखवून दिले पाहिजे की: (1) त्यांना एखाद्या संबंधित नियामक संस्थेने अधिकृत केले आहे; किंवा (2) ते यातून सूट मिळण्यास पात्र आहेत. कृपया नोंद घ्या: काही विशिष्ट प्रकारच्या जाहिरातदारांना G2 पडताळणी मिळवण्याची आवश्यकता नसते. G2 वित्तीय सेवा पडताळणी पत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया Google ची वित्तीय उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींविषयक धोरणे पाहा.

पायरी 2: ज्या वित्तीय सेवा जाहिरातदारांनी G2 वित्तीय सेवा पडताळणी पत्र मिळवले असेल त्यांनीसुद्धा त्यांच्या ओळखीची पडताळणी Google च्या जाहिरातदार पडताळणी प्रोग्रॅमच्या मार्फत करून घेतली पाहिजे. Google कडून आलेल्या जाहिरातदार पडताळणीची ईमेल पाहण्यासाठी कृपया तुमचा ईमेल इनबॉक्स पाहा. टीप: जाहिरातदारांनी जर पूर्वी Google चा जाहिरातदार पडताळणी प्रोग्रॅम पूर्ण केला असेल, तर त्यांनी पायरी 2 पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.

पायरी 3: पायरी 1 आणि 2 पूर्ण केल्यानंतर जाहिरातदार त्यांच्या निवडीच्या देशामध्ये वित्तीय सेवा जाहिराती दाखवण्यासाठी अर्ज करू शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जाहिराती दाखवण्यासाठी अर्ज कराल, तेव्हा तुम्हाला तुमचा G2 कोड विचारला जाईल. याशिवाय, जाहिरातदारांनी Google च्या वित्तीय उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींविषयक धोरणे यांचे अनुपालनही केले पाहिजे. Google Ads चा जाहिरातींसाठीचा अर्ज येथे मिळेल:

पडताळणी प्रक्रिया

जर तुमच्या व्यवसायाला एखाद्या लागू असलेल्या नियामक संस्थेने एखाद्या विशिष्ट देशामध्ये वित्तीय सेवा पुरवण्यासाठी अधिकृत केले असेल, तर पडताळणीसाठी खालच्या “अर्ज करा” बटनावर क्लिक करून अर्ज करा.

अत्यंत महत्त्वाचे: तुम्ही या पडताळणी प्रक्रियेत पुरवलेली व्यवसायाशी माहिती संबंधित रजिस्ट्रीमध्ये उपलब्ध माहितीशी तंतोतंत जुळली पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या संस्थेचे नाव किंवा नोंदणी क्रमांक वेगळा असेल किंवा संबंधित रजिस्ट्रीमध्ये उपलब्ध नसेल तर तुमची पडताळणी अयशस्वी होऊ शकते.

तुम्ही जर तुमचा अर्ज यशस्वीपणे सादर केला असेल, तर तुम्हाला G2 कडून एक पुष्टीदाखल ईमेल येईल, की तुमचा अर्ज मिळाला आहे. या पुष्टीदाखल ईमेलमध्ये तुमच्या विशिष्ट अर्जासाठीचा एक कोड असेल (तुमचा “G2 कोड”).

5 कॅलेंडर दिवसांमध्ये G2 तुम्हाला ईमेल करून तुमच्या अर्जाची स्थिती कळवेल (म्हणजे मंजूर झाला, नाकारण्यात आला). अर्ज मंजूर झाला, तर तुम्ही जेव्हा तुमच्या जाहिराती तुमच्या निवडलेल्या देशातील अशा लोकांना दाखवण्यास अर्ज कराल की जे तुमच्या देशामध्ये वित्तीय सेवांच्या शोधात असल्याचे दिसते, तेव्हा तुम्हाला तुमचा G2 कोड Google ला द्यावा लागेल.

सवलत प्रक्रिया

तुमचा व्यवसाय वित्तीय सेवा नियामक एजन्सीद्वारे अधिकृत नसेल तरीही तुम्ही अशा वापरकर्त्यांना लक्ष्य करू शकता जे आर्थिक सेवा शोधत आहेत असे दिसते.

यापैकी एका सवलतीसाठी अर्ज करावा का हे ठरवण्यासाठी कृपया खालील व्याख्यांचा आढावा घ्या.

सवलत दिलेले बिगर-वित्तीय सेवांचे जाहिरातदार: असे जाहिरातदार जे वित्तीय सेवांचा प्रचार करत नाहीत पण त्यांच्याकडे, वित्तीय सेवांच्या शोधात असल्याचे वाटत असलेल्या लोकांना शोधण्याचे सयुक्तिक कारण असते. उदाहरणे (ही संपूर्ण यादी नाही): सर्च इंजिन्स, ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्स, वकिलांच्या फर्म्स.

सवलत दिलेले वित्तीय सेवांचे जाहिरातदार:  असे वित्तीय सेवाविषयक जाहिराती करणारे जाहिरातदार, ज्यांना लागू कायद्यांतर्गत नोंदणी न करण्याची सवलत आहे.

तुम्ही जर तुमचा अर्ज यशस्वीपणे सादर केला असेल, तर तुम्हाला G2 कडून एक पुष्टीदाखल ईमेल येईल, की तुमचा अर्ज मिळाला आहे. या पुष्टीदाखल ईमेलमध्ये तुमच्या विशिष्ट अर्जासाठीचा एक कोड असेल (तुमचा “G2 कोड”).

5 कॅलेंडर दिवसांमध्ये G2 तुम्हाला ईमेल करून तुमच्या अर्जाची स्थिती कळवेल (म्हणजे मंजूर झाला, नाकारण्यात आला). अर्ज मंजूर झाला, तर तुम्ही जेव्हा तुमच्या जाहिराती तुमच्या निवडलेल्या देशातील अशा लोकांना दाखवण्यास अर्ज कराल की जे तुमच्या देशामध्ये वित्तीय सेवांच्या शोधात असल्याचे दिसते, तेव्हा तुम्हाला तुमचा G2 कोड Google ला द्यावा लागेल.

अर्ज करायला तयार आहात?

कृपया तुम्हाला जेथे जाहिराती करायच्या असतील तो देश निवडा.

अतिरिक्त माहितीसाठी कृपया आमचे खाली दिलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) पाहा किंवा संपर्क साधा financialservicesverification@g2llc.com

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions, FAQs)


1. G2 वित्तीय सेवा पडताळणीसाठी कोण अर्ज करू शकतात?
G2 वित्तीय सेवा पडताळणी पत्र मिळवण्यासाठी अर्जदारांना हे दाखवून द्यावे लागेल की: (1) त्यांना जेथे जाहिरात करायची आहे, त्या देशातील एखाद्या लागू नियामक संस्थेने त्यांना अधिकृत केले आहे; किंवा (2) ते सवलत मिळण्यास पात्र आहेत.
सवलत देण्याची प्रक्रिया दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातदारांसाठी उपलब्ध आहे: (1) सवलत दिलेले बिगर-वित्तीय सेवांचे जाहिरातदार (उदा. सर्च इंजिन्स, ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्स, वकिलांच्या फर्म्स); आणि (2) सवलत दिलेले वित्तीय सेवांचे जाहिरातदार. या दुसर्‍या वर्गात असे वित्तीय सेवाप्रदाते समाविष्ट आहेत ज्यांना लागू कायद्यांतर्गत परवाना मिळवणे/नोंदणी यांच्या आवश्यकतांमधून सवलत आहे.
2. पडताळणीसाठी किती खर्च येतो?
G2 वित्तीय सेवा पडताळणीसाठी जाहिरातदाराला काहीही खर्च येत नाही.3. अर्ज करण्यासाठी मला कोणती महिती गरजेची असेल?
तुम्हाला तुमच्या Google Ads खात्याविषयी माहिती आवश्यक असेल (उदा. Google Ads खात्याचा ग्राहक ID आणि पडताळणीसाठी अर्ज करणारा अधिकृत प्रतिनिधी). तुम्हाला तुमच्या व्यवसायाबदलची माहितीही असावी लागेल. कृपया नोंद घ्या: तुमची व्यवसायाशी माहिती संबंधित रजिस्ट्रीच्या डेटाबेसमध्ये मिळालेल्या माहितीशी तंतोतंत जुळली पाहिजे.4. माझ्या G2 वित्तीय सेवा पडताळणीमुळे मी वित्तीय सेवांची जगभर जाहिरात करू शकेन का?
नाही. G2 वित्तीय सेवा पडताळणी देश-विशिष्ट असते. सध्या G2 पडताळणी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि तैवान येथे आवश्यक आहे. तुम्हाला जर या तिन्ही देशांमध्ये अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला तीन अर्ज केले पाहिजेत.
5. अर्ज सादर केल्यापासून निर्णय मिळेपर्यंत प्रक्रिया होण्यास लागणारा अपेक्षित कालावधी किती आहे?
अपेक्षित कालावधी 5 कॅलेंडर दिवस किंवा त्याहून कमी इतका आहे.
6. अर्ज नाकारण्यात आला तर मी पुन्हा अर्ज करू शकतो/ते का?
होय. तुमचा अर्ज नाकारण्यात आला, तर तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण आणि (लागू असल्यास) सुचवलेले उपाय मिळतील.7. माझ्या अर्जाला G2 ने आधीच मान्यता दिली आहे, परंतु मला माझ्या डोमेनच्या नावांची यादी अद्ययावत करायची आहे, जेथे माझ्या जाहिराती वापरकर्त्यांना जायला सांगतील. मी काय करावे?
कृपया पुन्हा अर्ज करा आणि खालील गोष्ट दाखवणारा पर्याय निवडा: “माझ्या अर्जाचे यापूर्वी मूल्यमापन झाले होते. मला पुन्हा अर्ज करायचा आहे आणि माझ्या अर्जातील माहितीच्या फील्ड्समधील माहिती अद्ययावत करायची आहे.”  तुम्ही जेव्हा पुन्हा अर्ज  कराल, तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ अर्जाशी संबंधित G2 कोड सादर केलाच पाहिजे. महत्त्वाचे: या नंतरच्या अर्जात तुम्ही जी डोमेनची नावे पुरवाल ती तुम्ही पूर्वी पुरवलेल्या नावांच्या जागी येतील.
8. जरी माझी G2 पडताळणी झाली असली तरी Google ने जर माझ्या जाहिराती अमान्य केल्या तर मी काय करू?
G2 पडताळणी Google सोबत तुमच्या जाहिरात करण्याच्या पात्रतेची हमी देत नाही. जाहिरातींच्या संबंधातील सर्व चौकश्यांसाठी कृपया Google सह संपर्क साधा.
9. मला दर वर्षी पुन्हा पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल का?
नाही. तुम्हाला G2 वित्तीय सेवा पडताळणीसाठी (प्रत्येक देशासाठी) एकदाच अर्ज करावा लागेल. कृपया नोंद घ्या: पडताळणी केलेल्या सर्व संस्था अजूनही पडताळणी किंवा सवलत देण्याचे निकष पूर्ण करत राहतात, हे पाहण्यासाठी त्यांचे लेखा परीक्षण G2 नियमित काळाने करेल.
10. अशा काही परिस्थिती आहेत का. की जेव्हा G2 माझी पडताळणी रद्द करेल?
होय. जाहिरातदाराने पडताळणी प्रक्रियेत खोटी माहिती पुरवली असे G2 ने निश्चित केले, तर G2 ती पडताळणी रद्द करेल. आम्ही काही इतर परिस्थितींमध्येही पडताळणी रद्द करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही नियामकांच्या एखाद्या प्रतिकूल कारवाईच्या उत्तरादाखल, किंवा आम्ही जर पुष्टी केली की एखाद्या व्यवसायाला आता कायद्याच्या आवश्यकतेनुसार योग्य परवाना राहिलेला नाही किंवा तो कायद्यानुसार नोंदणीकृत राहिलेला नाही, तर आम्ही पडताळणी रद्द करू शकतो.