G2 वित्तीय सेवा पडताळणी (Privacy Policy Marathi)

शेवटचे अद्यतनित:

मे 31, 2022

गुप्तता धोरण

G2 वेब सर्व्हिसेस (“G2” किंवा “आम्ही”) गुप्ततेबद्दलच्या आपल्या चिंतांचा आदर करतो. हे धोरण G2 फायनान्शियल सर्व्हिसेसच्या पडताळणी सेवेशी संबंधित आम्ही संकलित करत असलेल्या वैयक्तिक डेटाला लागू होते. हे धोरण आम्ही मिळवत असलेल्या वैयक्तिक डेटाचे प्रकार, आम्ही वैयक्तिक डेटाचा वापर कसा करतो, आणि तो कुणाबरोबर सामाईक करतो याचे वर्णन करते. आपल्याला असू शकतील असे अधिकार आणि आमच्या गुप्तता प्रथांबाबत आपण आमच्याशी कसा संपर्क साधू शकता याचेही वर्णन आम्ही केले आहे.

ॲप्लिकेशन/पडताळणी प्रक्रियेमार्फत आम्ही संकलित करत असलेल्या वैयक्तिक डेटाच्या संदर्भात G2 हे डेटा नियंत्रक आहेत.  आमचे संपर्क तपशील, तसेच आमच्या प्रतिनिधीचे संपर्क तपशील हे या धोरणाच्या शेवटी “आमच्याशी संपर्क कसा साधावा” या विभागामध्ये मिळू शकतील.

1.   आम्ही आपल्याविषयी माहिती कशी मिळवतो

आमची उत्पादने आणि सेवांकरिता साईन अप करत असताना किंवा त्यांमध्ये प्रवेश करत असताना आपण आम्हाला जो डेटा पुरवण्याचे निवडता तो आपल्याबद्दलचा वैयक्तिक डेटा आम्ही संकलित करतो. संकलित केलेल्या वैयक्तिक डेटामध्ये पुढील डेटाचा समावेश होतो, परंतु तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही – आपले प्रथम आणि अंतिम नाव, ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, आणि आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती, जसे की परवाना क्रमांक किंवा डोमेनचे नाव.

2.   आम्ही मिळवतो ती माहिती

आपण थेट आम्हाला पुरवता असा वैयक्तिक डेटा हा आपण ज्या संदर्भात तो पुरवता त्यावरून स्पष्ट दिसून येईल. उदाहरणार्थ: जेव्हा आपण आम्हाला ई-मेल चौकशी पाठवता, किंवा साईन अप करताना किंवा आमच्या सेवांमध्ये प्रवेश मिळवताना फॉर्म भरता, तेव्हा आपण साधारणपणे आपले नाव, व्यवसाय संपर्क तपशील आणि फॉर्ममध्ये विनंती केलेली अन्य कोणतीही माहिती पुरवता. आवश्यक असणाऱ्या आणि संकलित केल्या जाणाऱ्या माहितीच्या बाबतीत प्रत्येक फॉर्म वेगळा असतो. बहुतांश बाबतीत, कोणती माहिती आवश्यक आहे हे निर्देशित केलेले असते. आपण जी आवश्यक नाही अशी अतिरिक्त माहिती पुरवण्याची निवड करू शकता.

3.   आम्ही मिळवतो ती माहिती आम्ही कशी वापरतो

आम्ही आपला वैयक्तिक डेटा आपल्याला आमच्या उत्पादने आणि सेवांना प्रवेश देणे, आपल्या चौकशीला प्रतिसाद देणे, उदाहरणार्थ आपल्या विनंतीबाबत आपल्याशी संपर्क साधणे, प्रश्न विचारणे, आमच्या उत्पादनातील बदल आणि भावी घटना याबाबतची निवेदने पुरवणे, सर्वेक्षण करणे आणि आमच्या सेवा देऊ करणे व त्यांच्यामध्ये सुधारणा करणे यांच्याशी संबंधित इतर कारणांकरिता आपल्याशी संपर्क साधणे यांकरिता वापरू शकतो.  आम्ही आपला वैयक्तिक डेटा या उद्देशांकरिता वापरतो कारण आमच्या ग्राहकांना तसेच इतर स्वारस्य असलेल्या ग्राहकांना सेवा पुरवण्यामध्ये आमचे वैध व्यवसाय हितसंबंध आहेत जे आपल्याबद्दलच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठीचे आपले हितसंबंध, अधिकार आणि स्वातंत्र्ये यामुळे रद्द होत नाहीत.

वर चर्चा केलेल्या वापरांच्या व्यतिरिक्त, आम्ही आपण ॲप्लिकेशन/पडताळणी प्रक्रियेच्या दरम्यान पुरवलेला वैयक्तिक डेटा पुढील कारणांसाठीही वापरू शकतो:

  • परिचालन, मूल्यमापन आणि आमच्या व्यवसायात सुधारणा करणे;
  • नवीन उत्पादने आणि सेवा विकसित करणे;
  • मार्केट संशोधन करणे;
  • आमची उत्पादने आणि सेवा यांची जाहिरात आणि मार्केटिंग करणे;
  • आमच्या जाहिराती आणि मार्केटिंग यांची परिणामकारकता निर्धारित करणे;
  • आमची उत्पादने, सेवा, आणि वेबसाईट यांचे विश्लेषण करणे;

आम्ही वर दिलेल्या उद्देशांकरिता वैयक्तिक डेटाचा वापर करतो कारण आमचा व्यवसाय चालवणे आणि सुधारणे यामध्ये आमचे वैध हितसंबंध आहेत जे आपल्याबद्दलच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठीचे आपले हितसंबंध, अधिकार आणि स्वातंत्र्ये यांमुळे रद्द होत नाहीत.

आम्ही माहिती फसवणूक, दावे आणि इतर उत्तरदायित्वे यांच्या विरोधात संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच लागू असलेल्या कायदेशीर आवश्यकता, उद्योग मानके आणि आमची धोरणे आणि अटी यांचे पालन करण्यासाठी किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यासाठीही वापरू शकतो.   जेव्हा आमच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करणे, ते लागू करणे किंवा त्यांचा बचाव करणे गरजेचे असते, किंवा जेव्हा आम्हाला लागू असलेल्या कायद्याद्वारे तसे करणे आम्हाला आवश्यक असते तेव्हा आम्ही या उद्देशांसाठी वैयक्तिक डेटाचा वापर करतो.

4.   आम्ही सामाईक करतो ती माहिती

आपण आम्हाला पुरवत असलेला किंवा ॲप्लिकेशन/पडताळणी प्रक्रियेमधून आम्ही संकलित करत असलेला वैयक्तिक डेटा आम्ही विकत नाही किंवा येथे वर्णन केल्यानुसार वगळता अन्यथा प्रकट करत नाही. आपण आम्हाला पुरवत असलेला किंवा ॲप्लिकेशन/पडताळणी प्रक्रियेमधून आम्ही संकलित करत असलेला वैयक्तिक डेटा आम्ही पुढे दिलेल्यांबरोबर सामाईक करू शकतो:

  • ट्रान्सयुनियन समूहाच्या इतर कंपन्या;
  • आमच्या वतीने सेवा पुरवणारे सेवा पुरवठादार; आणि
  • आमचे व्यवसाय भागीदार आणि सहयोगी.

ट्रान्सयुनियन समूहातील इतर कंपन्यांचे तपशील, ज्यामध्ये त्या जिथे स्थित आहेत त्या देशांचाही समावेश होतो, ते www.TransUnion.com वेबसाईट https://www.verisk.com/about/verisk-businesses/ वर मिळू शकतील.

आमच्या वतीने सेवा पुरवणारे सेवा पुरवठादार, जसे की पेमेंट सेवा पुरवठादार, विश्लेषण पुरवठादार, होस्टिंग पुरवठादार आणि जाहिरातकर्ते यांच्याबरोबर आम्ही वैयक्तिक डेटा सामाईक करू शकतो.  सर्व सेवा पुरवठादारांनी कायदेशीररीत्या बंधनकारक असलेले करार केले आहेत, ज्यामुळे त्यांना केवळ आमच्या वतीने सेवा पुरवण्यासाठी किंवा लागू असलेल्या कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्यासाठी गरजेचा असल्यानुसारच वैयक्तिक डेटा वापरणे किंवा प्रकट करणे आवश्यक आहे.

आम्ही वैयक्तिक डेटा ज्यांच्यासाठी आम्ही सेवा पुरवण्याला मान्यता दिली आहे अशा आमच्या व्यवसाय भागीदारांबरोबर सामाईक करू शकतो, ज्यामध्ये G2 फायनान्शियल सर्व्हिसेस पडताळणी सेवेचा समावेश होतो. आमच्या सर्व भागीदारांनी कायदेशीररीत्या बंधनकारक असलेले करार केले आहेत, ज्यामुळे त्यांना केवळ आमच्या वतीने सेवा पुरवण्यासाठी किंवा लागू असलेल्या कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्यासाठी गरजेचा असल्यानुसारच वैयक्तिक डेटा वापरणे किंवा प्रकट करणे आवश्यक आहे

त्या व्यतिरिक्त, आम्ही आपल्याबद्दलचा वैयक्तिक डेटा यासाठीही प्रकट करू शकतो (a) आम्हाला तसे करणे कायद्यानुसार किंवा कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक असेल किंवा त्याची परवानगी असेल, तर, उदाहरणार्थ न्यायालयीन आदेशामुळे किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीच्या विनंतीमुळे, (b) जेव्हा आम्हाला विश्वास असेल की शारीरिक इजा किंवा आर्थिक नुकसान यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रकटीकरण आवश्यक किंवा योग्य आहे, (c) संशयित किंवा प्रत्यक्ष फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर कृतीच्या तपासाच्या संबंधात, आणि (c) आम्ही आमचा व्यवसाय किंवा मालमत्ता संपूर्ण किंवा आंशिकरीत्या विकण्याच्या किंवा हस्तांतरित करण्याच्या घटनेमध्ये (ज्यामध्ये पुनर्रचना, विसर्जन किंवा परिसमापन या घटनांसह).

5.   डेटा हस्तांतरण

आम्ही आपल्याबद्दल संकलित करत असलेला वैयक्तिक डेटा तो वैयक्तिक डेटा मूलतः ज्या देशामध्ये संकलित करण्यात आला त्याव्यतिरिक्त इतर देशांमधील प्राप्तकर्त्यांना हस्तांतरित करू शकतो. त्या देशांमध्ये, आपण वैयक्तिक डेटा सुरुवातीला ज्या देशामध्ये पुरवला त्या देशासारखेच डेटा संरक्षण कायदे नसू शकतात. जेव्हा आम्ही आपला वैयक्तिक डेटा इतर देशांमधील प्राप्तकर्त्यांना हस्तांतरित करतो (जसे की युनायटेड स्टेट्स) तेव्हा त्या वैयक्तिक डेटाचे आम्ही या धोरणात वर्णन केल्यानुसार संरक्षण करू.

जर आपण युरोपियन इकॉनॉमिक एरिया (“EEA”), युनायटेड किंगडम (“UK”) किंवा स्वित्झर्लंडमध्ये स्थित असाल, तर आम्ही EEA, UK, आणि स्वित्झर्लंडच्या बाहेरील देशांमधील प्राप्तकर्त्यांना वैयक्तिक डेटा हस्तांतरित करण्यासाठी पुरेसे संरक्षण देणाऱ्या लागू असलेल्या कायदेशीर आवश्यकतांचे पालन करू.  अशा सर्व प्रकरणामध्ये आम्ही आपला वैयक्तिक डेटा केवळ तेव्हाच हस्तांतरित करू जेव्हा:

“आमच्याशी संपर्क कसा साधावा” या खालील विभागात वर्णन केल्यानुसार आमच्याशी संपर्क साधून आपण वैयक्तिक डेटाच्या हस्तांतरणाच्या संदर्भात आम्ही केलेल्या सुरक्षा उपायांची प्रत मिळण्याची विनंती करू शकता.

6.   आम्ही माहिती किती काळ ठेवतो

आम्ही वैयक्तिक डेटा किती काळासाठी ठेवतो तो कालावधी आम्ही तो कशासाठी संकलित केला त्या उद्देशावर अवलंबून असतो.  सर्व प्रकरणांमध्ये आम्ही तो ज्याकरिता संकलित केला ते उद्देश पूर्ण करण्यासाठी गरज असेल तितका काळ आम्ही तो ठेवू.  त्यानंतर आम्ही वैयक्तिक डेटा पुसून टाकू, जर तो ठेवणे हे आम्हाला कायद्यानुसार आवश्यक नसेल किंवा आमच्या कायदेशीर उत्तरदायित्वांचे पालन करण्यासाठी तो ठेवण्याची आम्हाला गरज नसेल (उदाहरणार्थ, कर आणि अकाऊंटिंगच्या हेतूने) तरच.

कोणत्याही लागू असलेल्या कायदेशीर आवश्यकतांच्या अधीन, आम्ही आपण ॲप्लिकेशन/पडताळणी प्रक्रियेमार्फत आम्हाला पुरवलेला वैयक्तिक डेटा नमुनेदाररीत्या राखून ठेवतो: आम्हा हा वैयक्तिक डेटा आपल्या ॲप्लिकेशनवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असेल तोपर्यंत आणि आपल्याला आम्हाला आणखी विनंत्या पाठवायच्या असू शकतील म्हणून थोड्या आणखी काळासाठी राखून ठेवतो.

7.   आपले अधिकार आणि निवडी

जर आपण युरोपियन इकॉनॉमिक एरिया (“EEA”), UK, किंवा स्वित्झर्लंडमध्ये स्थित असाल तर आम्ही आपल्याबद्दल राखून ठेवलेल्या वैयक्तिक डेटाच्या संबंधामध्ये आपल्याला पुढील अधिकार असू शकतात:

  • आपल्याशी संबंधित वैयक्तिक डेटावर आम्ही प्रक्रिया करतो का याच्या पुष्टीची विनंती करणे, आणि तसे असल्यास त्या वैयक्तिक डेटाच्या प्रतीची विनंती करणे;
  • तशी विनंती करण्यासाठी आम्ही आपला अचूक नसलेला, अपूर्ण असलेला किंवा कालबाह्य झालेला डेटा आम्ही दुरुस्त किंवा अद्ययावत करण्याची विनंती करणे.
  • विशिष्ट परिस्थितींमध्ये आम्ही आपला वैयक्तिक डेटा पुसावा अशी विनंती करणे, जसे की आम्ही आपल्या संमतीच्या आधारे वैयक्तिक डेटा संकलित केला असेल आणि आपण आपली संमती मागे घेतली असेल;
  • आम्ही तुमच्या वैयक्तिक डेटाचा वापर काही विशिष्ट परिस्थितींमध्ये प्रतिबंधित करतो अशी विनंती करण्यासाठी, जसे की तुम्ही सबमिट केलेल्या दुसर्‍या विनंतीवर आम्ही विचार करत असताना, उदाहरणार्थ आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा अद्यतनित करण्याची विनंती;
  • जेथे आपण आपल्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्याची संमती आम्हाला दिली असेल तिथे, आपली संमती मागे घेणे; आणि
  • विशिष्ट परिस्थितींमध्ये, आम्ही आपल्या वैयक्तिक डेटाची प्रत पद्धतशीर, सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या आणि मशीनला वाचता येईल अशा फॉरमॅटमध्ये पुरवावी अशी विनंती करणे.

वर वर्णन केलेल्या आपल्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण आम्हाला ई-मेल द्वारे किंवा खालील “आमच्याशी संपर्क कसा साधावा” या विभागात वर्णन केल्यानुसार संपर्क साधू शकता.

आपल्याला आपल्या देशातील डेटा संरक्षण पर्यवेक्षकीय प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवण्याचाही अधिकार आहे.  आपल्या देशातील डेटा संरक्षण पर्यवेक्षकीय प्राधिकरणाची संपर्क माहिती आपल्याला मिळेल येथे.

8.   आमच्या धोरणातील अद्यतने

आम्ही ठराविक कालांतराने आणि आपल्याला पूर्व सूचना न देता, आमच्या वैयक्तिक डेटा पद्धतींमधील किंवा संबंधित कायद्यांमधील कोणतेही बदल प्रतिबिंबित करण्यासाठी या धोरणामध्ये अद्यतने करू शकतो. आम्ही अद्यतनित आवृत्ती पोस्ट करू आणि त्यामध्ये सर्वात ताजी अद्यतने केव्हा करण्यात आल्या ते सर्वात वर दर्शवू.

9.   आमच्याशी संपर्क कसा साधावा

जर आपल्याला या धोरणाबद्दल कोणतेही प्रश्न किंवा टिप्पणी असतील किंवा आम्ही वैयक्तिक डेटा कसा संकलित करतो, वापरतो किंवा प्रकट करतो यासंबंधी कोणतीही समस्या असेल, किंवा जर आपल्याला आमच्याकडे असलेल्या आपली माहितीला किंवा आपल्या पसंतींना आमच्याकडून अद्यतनित करून घ्यायचे असेल तर आपण आमच्याशी येथे संपर्क साधू शकता:

ईमे-ल द्वारे: clientservices@g2llc.com

येथे लिखित स्वरूपात:

G2 वेब सर्व्हिसेस
यांनी लक्ष द्यावे: डेटा प्रोटेक्शन ऑफिसर
1750 112 वा ॲवेन्यू NE, बेलेव्यू, WA 98004, USA

[मी मान्य करीत आहे की मी G2 फायनान्शियल सर्व्हिसेस पडताळणी गुप्तता धोरण वाचले आहे आणि मला ते समजले आहे आणि येथे मी त्यामध्ये वर्णन केल्यानुसार वैयक्तिक डेटाचे संकलन आणि वापर करण्यास संमती देत आहे.]